Ad will apear here
Next
‘मुख्यमंत्री सचिवालयातील आदरातिथ्यावरील खर्च पूर्वीसारखाच’
आशीष शेलारमुंबई : ‘मुख्यमंत्री सचिवालयात आदरातिथ्यावर केलेल्या दरवर्षीच्या खर्चाची आकडेवारी पाहिली, तर ही सरासरी आधीच्या सरकराच्या कार्यकाळात होती तशीच आहे. असे असताना काँग्रेसचे बेताल नेते संजय निरूपम हे बरळतात आणि त्याचीच री महाराष्ट्रातील ‘जाणते’ नेतृत्त्व म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते सन्माननीय शरद पवारही ओढतात, याचे नवल वाटते,’ असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

‘एकतर हा खर्च केवळ मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाचा नाही, तर सह्याद्री, वर्षा, नागपुरातील रामगिरी आणि हैदराबाद हाऊस यांचा एकत्रितपणे आहे. तो  केवळ चहापानाचा नाही, तर विविध विभागांच्या घेतल्या जाणाऱ्या बैठकींचा चहा, नाश्ता, सत्कार-स्वागतासाठी लागणारी सामुग्री, पुष्पगुच्छ, वेळोवेळी विदेशी शिष्टमंडळांसाठी आयोजित केले जाणारे आदरातिथ्य इत्यादींचा एकत्रित आहे. दुसरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात बहुतेक वेळी परदेशातील शिष्टमंडळाच्या बैठकी या पंचतारांकित हॉटेल्समध्ये व्हायच्या, त्या आता सह्याद्रीला होत आहेत,’ असे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
 
शेलार यांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ वर्षनिहाय खर्चाची आकडेवारी प्रस्तुत केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. 
२०११-१२    १,१६,६८,४६८
२०१२-१३    १,१५,९१,६८३
२०१३-१४    १,६०,४२,७२७
२०१४-१५    १,१४,२५,८११ (काँग्रेस-राष्ट्रवादीच्याकाळापुरता)
२०१५-१६    ५७,९९,१५६
२०१६-१७    १,२०,९२,९७२
२०१७-१८    ३,३४,६४,९०५

‘सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, यातील २०१७-१८ या वर्षांत जे देयक अदा करण्यात आले, तो खर्च दाखविण्यात आला आहे. याचा अर्थ ती संपूर्ण रक्कम त्या वर्षातील नाही, तर गेल्या वर्षीची रक्कमसुद्धा त्यात अंतर्भूत आहे. त्याची नेमकी आकडेवारीसुद्धा आपण लवकरच जाहीर करू. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून बैठकींची वाढलेली संख्या आणि विविध वस्तुंच्या दरांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊनसुद्धा, हा खर्च सरासरी सामान्य आहे. त्यामुळे विरोधकांनी या विषयावर फालतू राजकारण करणे बंद करावे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झालेला खर्चसुद्धा मी मांडला आहे. आता मला माहिती नाही, असे शरद पवार म्हणू शकत नाहीत. त्यांना खरोखर माहिती नसेल, तर त्यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती. पण, सोयीचे प्रश्न विचारून माहिती अधिकारातून माहिती घ्यायची आणि सरकारविरूद्ध काहीच सापडत नाही म्हणून, असे खालच्या पातळीचे राजकारण करायचे, हा प्रकार अतिशय घृणास्पद आणि विरोधकांची पातळी किती घसरली हेच दर्शविणारा आहे,’ असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZIPBM
Similar Posts
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
‘देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते दोन या दीड तासाच्या वेळेत संपूर्ण देशभरातील एक कोटीहून अधिक ‘भाजप’ हितचिंतक व कार्यकर्त्यांशी
‘भाजपच्या राजकीय सामर्थ्यामध्ये अनुसूचित मोर्चाचा वाटा महत्त्वाचा’ मुंबई : ‘भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला असून पक्षाच्या सामर्थ्यामध्ये अनुसूचित जाती मोर्चाचा वाटा महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी केले. भाजप प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या दोन दिवसांच्या अभ्यासवर्ग व प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language